राज्यात २२ एप्रिल रात्री ८ पासून कडक लॉकडाऊन, हे आहेत नवे नियम

राज्य सरकारकडून आज Break The Chain चे नवीन नियम जारी करण्यात आले आहेत, या नियमांनुसार राज्यातील LOCKDOWN कडक होणार असल्याचं दिसून येत आहे. कारण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय आणि तसेच ठराविक वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याशिवाय घराबाहेर पडता येणार नाही आहे. (updated lockdown rules)  किराणा, दूध, फळे, अंडी, मटण, भाजीपाला (जीवनावश्यक वस्तू) याविषयी नवीन नियमात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नसल्याने सकाळी ७ ते ११ दरम्यान ही विक्री आणि खरेदी करता येणार आहे.

एवढंच काय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात काय, तर एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करता येणार नाहीय. लग्नात २५ पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असेल तर ५० हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. याआधी हा दंड फक्त १० हजार होता, त्यामुळे १० हजार रुपयात सुटका होत होती, पण आता ५० हजार आणि कारवाईचा देखील सामना करावा लागणार आहे.

कार्यालयीन उपस्थिती

सर्व सरकारी कार्यालये (राज्य, केंद्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या अखत्यारितील)
कोविड-१९ व्यवस्थापनाच्या संदर्भातील थेट आपत्कालीन सेवावगळता उर्वरित कर्मचाऱ्यांच्या
१५ टक्के उपस्थितीत कामकाज करतील.

१.  मंत्रालय तसेच मुंबई महानगर प्रदेशातील सरकारी कार्यलयांसंदर्भात महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने विभागप्रमुख १५ टक्क्यांपेक्षा जास्ती कर्मचारी
हजेरीबद्दल निर्णय घेऊ शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *