कांदा लिलावाला करोनाची बाधा!

करोना पॉझिटिव्ह होत असलेले कांदा व्यापारी, वेळवर आणि योग्य उपचारांउभावी कर्मचारी, कामगारांचे होणारे मृत्यू अशा दहशतीमुळे लासलगाव बाजार समितीतील लिलाव प्रक्रिया सोमवारी थांबली. विंचूर उपबाजार येथीलही करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लिलाव बंद ठेवण्यात आले. येत्या २५ एप्रिलपर्यंत लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

 एकिकडे लाल कांद्याचा हंगामातील शेवटचा टप्पा, तर दुसरीकडे उन्हाळ कांद्याची वाढलेली आवक यामुळे लासलगाव बाजार समितीत गर्दी होत असतानाच करोनाच्या भीतीने सोमवारी लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली. या निर्णयामुळे बाजार समितीच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. लासलगाव व्यापारी असोसिएशनने बाजार समितीला निवेदन देत करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २५ एप्रिलपर्यंत लिलावात सहभागी न होण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *