भांडणानंतर पत्नीला जीपमध्ये बसवून दरीत ढकलले, जागीच मृत्यू

हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीमधील भांडणाचे पर्यावसन पत्नीच्या हत्येत झाले. सोलन जिल्ह्यातील नालागढ भागडा गावात ही घटना घडली. पती आणि पत्नीचे घरी भांडण झाले. त्यानंतर पतीने तिला जीपमध्ये बसवून नेले आणि जीपसह तिलाही दरीत ढकलून दिली. यात पत्नीचा मृत्यू झाला.

या घटनेत जीपमध्ये बसलेला पतीही जखमी झाला आहे. त्याला पीजीआय चंदीगड येथे दाखल करण्यात आले आहे. नालागढचे डीएसपी नवदीप सिंह यांनी सांगितले की, जोघो पोलीस चौकीच्या हद्दीत येणाऱ्या नाल भागडा गावातील सुरेंद्र सिंह आणि त्याची पत्नी आशा कुमारी यांच्यात वाद झाले. महिलेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, दोघांच्यात वाद झाल्यानंतर सुरेंद्र आशाकुमारी हिला जीपमध्ये बसवून घेऊन गेला. नालागढ-स्वारघाट मार्गावरून तो घेऊन गेला.

सुरेंद्र याने कुंडलू पंचायत हद्दीतील पाणी वळणावरील दरीत ६० फूट खोल जीप ढकलून दिली. यावेळी तोही या जीपमध्ये होता. पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर तो जखमी झाला आहे. त्याला पीजीआयला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुरेंद्र सिंह याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *