कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी आता कोविड टेस्ट बंधनकारक

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात यायचे असेल तर कोव्हिड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोविड चाचणी केली नसेल तर 7 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा आदेश दिला आहे.

कोल्हापुरात बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची लस घेतली असेल तर चाचणी बंधनकारक नसणार आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचं प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे. इतर जिल्ह्यातील येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याने कोल्हापुरात आता बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींसाठी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *