जीवदानी’च्या दर्शनासाठी भाविकांना हवाई सुविधा

जीवदानी’च्या दर्शनासाठी भाविकांना हवाई सुविधा

विरारच्या जीवदानी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना हेलिकॉप्टरने सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक नुकतेच पार पडले. पुण्याच्या एका खासगी कंपनीकडून ही सेवा राबविली जाणार असून त्यासाठी हेलिपॅड जीवदानी मंदिराच्या मैदानात तयार करण्यात आले आहे. महिनाभराच्या आताच ही सेवा भाविकांसाठी सुरू केली जाणार आहे.

विरारचे जीवदानी मंदिर हे विरारमधील सुप्रसिद्ध मंदिर असून महाराष्ट्रातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. नुकतेच या मंदिरात फनीक्युलर ट्रेनची सुविधा भाविकांसाठी सु्नरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता हेलिकॉप्टरचीपण सेवा सुरू केली जाणार आहे. पुण्यातील वरद एव्हिएशन या खासगी संस्थेकडून ही सेवा पुरविली जाणार आहे.  शनिवार आणि रविवार ही सेवा सुरूअसेल.  यात एका वेळी पाच भाविकांना गडावर घेऊन जाता येणार आहे. त्याची दर साधारणपणे ३५०० ते ५००० रुपयाच्या दरम्यान असतील अशी माहिती जीवदानी मंदिराचे संचालक प्रदीप तेंडुलकर यांनी दिली आहे. त्याचबरोबर मंदिराने त्यांना आता एक तात्पुरते हेलिपॅड तयार करून दिले असून भविष्यात हायड्रोलिक हेलिपॅडसुद्धा तयार करून देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला आहे. तसेच येणाऱ्या काळात ही सेवा कशी अधिक स्वस्त केली जाईल याबाबत विचार केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *