सांगलीत बिबट्या दिसल्याने खळबळ

सांगलीमध्ये बिबट्या दिसला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील राजवाडा परिसरात बिबट्या दिसला आहे. सकाळी साडेसहा वाजता राजवाडा चौकातील पटेल चौक मार्गावरून आलेल्या बिबट्याने बंद बंगल्यात ठाण मांडल्याची चर्चा होती. यानंतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. पाऊलखुणा मिळाल्याने बिबट्या आगमनाची पुष्टी झाली आहे.

बिबट्या दिसला असल्याची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या दिसल्याची बातमी पसरतात परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. अखेर पोलिसांना सुरक्षेची उपाययोजना म्हणून संचारबंदी लावावी लागली. डीवायएसपी अजित टिके घटनास्थळी उपस्थित असून प्राणीमित्रांची मदत घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *