जिथं मनसुख हिरन यांचा मृतदेह आढळला होता, तिथं आणखी एक मृतदेह

व्यावसायिक मनसुख हिरन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून राज्यात राजकीय गदारोळ सुरू असतानाच, आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी मनसुख यांचा मृतदेह जिथं आढळला होता, तिथंच आणखी एक मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळं या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेती बंद येथे आढळलेला मृतदेह ४८ वर्षीय इसमाचा असून शकील सलीम अब्दुल असं त्याचं नाव आहे. तो रेती बंदर येथील रहिवासी आहे. स्थानिक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मनसुख प्रकरणाशी या मृतदेहाचा काही संबंध आहे का, याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *