नवी मुंबई : स्वत:च्याच घरातील दागिने चोरून तरुण फरार

तुर्भे सेक्टर-२१ भागात राहाणाऱ्या एका तरुणाने आपल्याच घरातील तब्बल ७ लाख ७८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. मतिन नूर कासम शेख (२२) असे या तरुणाचे नाव असून त्याच्या वडिलांनीच त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

मतिनने शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आई-वडिलांच्या कपाटामधील दागिने चोरून पलायन केले. त्याचे वडील नूर कासम शेख हे कामाहून घरी परतल्यानंतर त्यांना आपले कपाट उघडे असल्याचे दिसले. तसेच मतिनचा मोबाइल फोनदेखील बंद असल्याचे आढळून आले. यापूर्वीदेखील त्याने या कपाटातील लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याने आधारकार्ड शोधत असल्याचा बहाणा करून वेळ मारून नेली होती. त्यामुळे ही चोरीही त्यानेच केली असावी या संशयातून त्याच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *