जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोडा बांधण्याची परवानगी मागणाऱ्या लेखाधिकाऱ्याचा अखेर माफिनामा

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोडा बांधण्याची परवानगी मागणाऱ्या लेखाधिकाऱ्याचा अखेर माफिनामा

सहायक लेखाधिकारी (रोहयो) सतीश पंजाबराव देशमुख यांनी अखेर, जिल्हाधिकारी कार्यालायाच्या आवारात घोडा बांधण्याची आपली मागणी मागे घेत, माफीनामा सादर केला आहे.  घोडा खरेदीची व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बांधण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती करणारे एक पत्र सतीश देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले होते. त्यात पाठीच्या दुखण्यामुळे वेळेत कार्यालयात येण्यासाठी घोडा खरेदीची व त्याला बांधण्याची परवानगी मागितली होती.

यानंतर हे पत्र समाज माध्यमावर तुफान व्हायरल झाल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली. अशा प्रकारची विनंती करणाऱ्या पत्राबाबतच्या वृत्ताला निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी देखील दुजोरा दिला. तर, सतीश देशमुख यांच्या मागणीवर वैद्यकीय अधिष्ठातांचा अभिप्राय मागवला गेला. अस्थिव्यंग विभागाने पाठीच्या कण्याच्या दुखण्यावर दुचाकीऐवजी घोड्यावर बसून कार्यालयात येणे, हा उपाय संयुक्तिक नसल्याचा अभिप्राय दिला. तो अधिष्ठातांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठवला.यानंतर या सतीश देशमुख यांनी त्यांची मागणी मागे घेत माफीनामा सादर केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

दरम्यान, आपण ऑफिसला येताना घोड्यावर येण्याचा विचार करत असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये मला घोडा बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सहाय्यक लेखाधिकारी असणाऱ्या सतीश देशमुख यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *