कोरोनामुळे पंढरपूरची माघी वारीही रद्द, 10 गावांत संचारबंदी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता आषाढवारीनंतर पंढरपूरची   माघीवारीही रद्द करण्यात आलं आहे. कोरोनामुळे पंढरपूर शहरासह 10 गावांमध्ये संचारबंदी देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनामुळे आषाढी वारीनंतर आता माघी वारीही रद्द करण्यात आलीये. पंढरपूर शहरासह शेजारच्या दहा गावांमध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आलेत. 22 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून 23 फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी असणार आहे.. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबादचे आदेश काढले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे पांडुरंगाची भेट लांबली आहे. माघ वारी रद्द झाल्यामुळे वारकरी संप्रदायातील नव्या वर्षातील पहिल्या यात्रेच्या मार्गातही कोरोनाचं सावटं आल्याचं दिसत आहे. डिसेंबरनंतर पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. यामुळे राज्य सरकारने नवी नियमावलीही जाहीर केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी पंढरपूर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *