आसाराम बापूच्या आश्रमात चोरी

मध्य प्रदेशातील इंदूरच्या खंडवा रोडजवळील आसाराम बापूच्या आश्रमात चोरी झाली. चोरट्यांनी चांदीच्या पादुका चोरून पोबारा केला. तसेच आश्रम परिसरातील चंदनाची झाडेही चोरी केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र, चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ही घटना सोमवारी रात्री घडली. आश्रमाचे व्यवस्थापक मुकेश पटेल यांच्या माहितीनुसार, १८ जानेवारी रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास चोर आश्रमात घुसले. त्यांनी आसारामच्या चांदीच्या पादुका चोरल्या. त्यानंतर चंदनाची झाडे कापून ती पळवली. गेल्या महिनाभरापासून आश्रम परिसरातील चंदनाची झाडे चोरीला जात आहेत. मात्र, चोर हाती लागू शकले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *