सोने, चांदीच्या दरांत पुन्हा उसळी

गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरांत मोठी चढ-उतार होतोना दिसत आहे. मात्र आता सोने, चांदीच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे. त्यामुळे ग्रहाकांमध्ये सोने खरदी करायला हवी की नको असा प्रश्न निर्माण होत आहे. दिल्ली बुधवारी सोन्याच्या दरांत 347 रुपयांची वाढ नोंदली गेली. त्यामुळे आता 10 ग्राम सोने खरेदी करण्यासाठी 48 हजार 758 रूपये मोजावे लागणार आहेत.

देशांतर्गत बाजारात चांदीच्या भावातही बुधवारी वाढ नोंदली गेली. चांदीचे दर 606 रूपायांनी वाढले आहेत. बुधवारी झालेली वाढ लक्षात घेता आता चांदी खरेदी करण्यासाठी 65 हजार 814 रूपये मोजावे लागणार आहेत. मागील सत्रात चांदीचे दर 65 हजार 208 रूपयांवर पोहोचले होते.

जागतिक स्तरावर किंमतींच्या वाढीमुळे सोन्याच्या किंमतीतही वाढ दिसून आली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मागील सत्रात सोन्याचे दर 48 हजार 411 रूपयांवर पोहोचले होते. त्यामुळे सोन्याची मागणी काही प्रमाणात घटली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी सोन्या-चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांत वाढ झाली. जागतिक बाजारात सोन्याची किंमत डॉलर प्रति औंस 1,854 तर चांदीचे दर 25.28 डॉलर प्रति औंस नोंदवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *