कडकनाथ घोटाळ्यात फसवणूक झालेल्या महिलेची आत्महत्या

कडकनाथ  कुक्कुटपालन घोटाळ्यात नऊ लाख रुपयांची फसवणूक झालेल्या महिलेने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. नंदा हंबीरराव साळुंखे (रा. इस्लामपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. कडकनाथ कुक्कुटपालनात फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून नंदा यांनी आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली आहे.

राज्यातील कडकनाथ घोटाळयाकडे भाजपसह महाविकास आघाडीनेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कडकनाथ घोटाळयाचा तपास थांबलेला आहे. घोटाळ्यातील दोषींवर तातडीने कारवाई करावी. अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *