कार पुढे घेण्यास सांगितलं, दूध विक्रेत्याला लाथाबुक्क्यांनी मारले

कार पुढे घेण्यास सांगितल्यावरून दूध विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला व दगडफेक करण्यात आली. हा प्रकार २३ जून रोजी दुपारी जाधववाडी, नवीन मोंढा येथील देवगिरी महानंद दूध स्टॉलवर घडला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी डिगांबर भिवसेन पंडित (६०, रा. एन नऊ, एम दोन, हडको) यांनी तक्रार दाखल केली. पंडित यांचा जाधववाडी येथे दूध विक्रीचा ‘स्टॉल’ आहे. २३ जून रोजी दुपारी पंडित दूध विक्री करीत होते. यावेळी एक विटकरी रंगाची कार त्यांच्या दुकानासमोर चालकाने उभी केली. यावेळी पंडित यांनी त्यांना कार पुढे घेण्यास सांगितले. या कारणावरून वाद होऊन कारमधील लोकांनी पंडित यांना शिवीगाळ सुरू केली. त्यांच्यावर दगडफेक करीत लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. पंडित यांना ठार मारण्याची धमकी देखील यावेळी देण्यात आली. याप्रकरणी पंडित यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी हरिष पवार, युवराज हरिष पवार, त्याचा साडू, मनाभाऊ, हमाल हांडे यांच्या विरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात दगडफेक करणे, मारहाण करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक डोंगरे तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *