मुंबईत बँकेच्या कार्यालयात मोठी आग; महत्त्वाची कागदपत्रे जळाली

नरीमन पॉइंट भागातील जॉली मेकर इमारतीतील एका बँकेच्या कार्यालयात आज पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत कुणीही जखमी झाले नसले तरी बँकेतील कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याची माहिती आहे.

जमनालाल बजाज मार्गावर असलेल्या जॉली मेकर चेंबर २ या इमारतीच्या तळमजल्यावर बँक ऑफ बहरीन अँड कुवेतचे कार्यालय आहे. सुमारे ४ हजार चौरस फुटांच्या या कार्यालयातील सर्व्हर रूममध्ये ही आग लागली. आगीत बँकेतील फर्निचर, एसी, संगणक, इलेक्ट्रिक वायरिंग व काही फाइल्स जळून खाक सांगण्यात येते. दरवाजे, खिडक्या बंद असल्यामुळं धुराचे लोट संपूर्ण कार्यालयात पसरले होते.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बँकेचा दरवाजा तोडला आणि कुलिंग ऑपरेशन सुरू केले. बऱ्याच प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग नेमकी कशामुळं लागली याचं कारण समजू शकलेलं नाही. या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *