ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची बदली

ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची बदली करण्यात आली आहे. त्या पदावर डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भातले पत्र पाठवले आहे. डॉ. विपीन शर्मा हे विदेशी प्रशिक्षणासाठी गेले आहेत.

तिथून आल्यानंतर त्यांनी तातडीने ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारावा असं कुंटे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. मार्च २०२० ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली होती.

ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अतिरिक्त आयुक्तांकडे पदभार देऊन सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संजीव जयस्वाल यांच्या जागी विजय सिंघल यांच्याकडे आयुक्तपद देण्यात आले होते.

मागील महिन्यात मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेसी, उल्हासनगर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख,पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्या बदल्या केल्या होत्या.

दोन दिवसांपूर्वी भिवंडी महापालिका आयुक्त म्हणून डॉ पंकज आशिया, तर आज नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर, उल्हासनगर महापालिका आयुक्तपदी डॉ. दयानिधी, मीरा भाईंदर महापालिका आयुक्त म्हणून विजय राठोड यांची नियुक्ती केली आहे. यामागे सदर महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता न आल्याने या महापालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *