मुक्ताईनगर तालुक्यात स्थानिक भाजप नेत्याची हत्या

कुऱ्हा काकोडा येथे एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. काही अज्ञातांनी भाजप नेत्याची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या कुऱ्हा काकोडा येथे भाजपचे  माजी सभापती डि. ओ. पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण आहे. त्यांच्या हत्येचे कारण समजू शकलेले नाही.

काल रात्रीच्या सुमारास कुऱ्हा काकोडा येथील इंडियन पेट्रोल पंपाजवळ अज्ञातांनी माजी सभापती पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत. हत्या करण्यात आल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोरोना संकट असताना सोशल डिस्टंसिंग पाळण्यात आले नव्हते.

हत्येमुळे परिसरात तणावर पसरला आहे. कुऱ्हा कोकोडा येथील घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून त्याठिकाणी फॉरेन्सिक आणि  श्वान पथकही दाखळ झाले आहे. पोलिसांकडून अद्याप कोणाकडून हल्ला झाला याची माहिती देण्यात आलेली नाही. अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *