मुलीच्या लग्नात तिचा प्रियकर अडथळा आणेल या कारणास्तव मुलीच्या आईने कट रचत प्रियकराची हत्या केली. मुलगा, भाऊ, मुलीचा होणारा नवरा आणि त्याचा मित्र यांच्या मदतीने कृत्य केले .
26 मे रोजी लग्नाची पार्टी साजरी करू अस म्हणून चार पुरुष आरोपींनी पंडित खडके या 20 वर्षीय प्रियकराला ओंडली गावच्या जंगल परिसरात नेऊन त्याला दारु पाजली आणि गळा आवळून खून केला. 1 जूनला मयताच्या घरच्यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात मिसिंगची केस दाखल केली होती. चार दिवसांपूर्वी 11 जूनला पंडित खडकेचा मृतदेहाचा संगाडा कुजलेल्या अवस्थेत मिळाला. पोलिसांनी तपास करत मृतदेहाची ओळख पटवली असता प्रियकराच्या आईने पोलिसांना मुलीच्या आईवर संशय असल्याचतद सांगताच धक्कादायक वास्तव समोर आले.
मुलीची आई चांगुनाबाई मेंगाळसह तिचा मुलगा, भाऊ, होणारा नवरा आणि त्याचा मित्र यांच्यावर घोटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी ताब्यात घेतले आहे. 7 जूनला मुलीचा विवाह होता.
