‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पितृशोक

‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पितृशोक

‘सामना’च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील माधव पाटणकर यांचं आज (15 जून) निधन झालं. अल्पशा आजाराने वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रश्मी ठाकरे यांचं माहेर डोंबिवली इथलं आहे.

दरम्यान रश्मी ठाकरे यांनी पितृशोक झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या नियोजित बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

माधव पाटणकर यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे आणि रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पाटणकर आणि ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली,” असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *