कॅन्सरने मुलीचे निधन; वृद्ध आईने उचलले ‘हे’ पाऊल

मुंबई: कांदिवली पश्चिमेतील प्राणिक गार्डन टॉवरमध्ये राहणाऱ्या पद्मावती धानक (८०) यांनी रविवारी सकाळी १३ व्या मजल्यावरील राहत्या घरातून उडी घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या निधनानंतर जावयासोबत राहणाऱ्या धानक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी गुजरातीत लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे.

रविवारी जावई मॉर्निंग वॉक घेण्यासाठी गेले असता धानक यांनी घरातून उडी मारून आत्महत्या केली. कॅन्सर या आजाराने ग्रस्त असलेल्या विवाहित मुलीचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाल्याने जगण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी मागे ठेवलेल्या चिट्ठीत लिहून ठेवले आहे. त्यात माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे नमूद केले आहे. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केल्याचे कांदिवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवी अडाणे यांनी सांगितले.

दरम्यान, वृद्ध महिलेच्या आत्महत्येने कांदिवलीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *