मुलीसोबतचं भांडण सोडवायला गेली; जावयानं केली सासूची हत्या

विरारमध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने आपल्या कुटुंबावर हल्ला केल्याचे समोर आले असून यात त्याच्या सासूचा मृत्यू झाला. पत्नी व मुलगा जखमी झाले आहेत. हल्लेखोर पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

विरार पूर्वेकडील मनवेलपाडा परिसरातील ब्रह्मा कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या मुकेश कदरेकर याचा त्याच्या पत्नीशी शुक्रवारी सकाळी घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की मुकेशने आपल्या पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान त्याची सासू मालिनी साळवे (६५) ही भांडण सोडवण्यास गेली असता तिच्या डोक्यात वार केला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला तर त्याची पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा हे चाकूहल्ल्यात जखमी झाले आहेत. हत्येनंतर मुकेश पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. विरार पोलिसांनी मुकेशवर हत्येचा गुन्हा नोंदवला. पोलिस पुढचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *