उत्तर प्रदेश: औरैयात भीषण अपघात; घरी निघालेल्या २४ मजूर ठार

औरैया येथे झालेल्या भीषण अपघातात २४ स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झाला आहे. एका ट्रकद्वारे हे मजूर राजस्थानहून आपपल्या घरी निघाले होते. या भीषण अपघातात २२ मजूर जखमी झाले आहे. मजुरांना घेऊन भरधाव निघालेल्या ट्रकला समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला.

आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमाराला हा भीषण अपघात झाला. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे मजूर बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील होते.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरू केले. या अपघातात २४ मजुरांचा मृत्यू झाला असून २२ मजूर जखमी झाले आहेत. सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी १५ मजूर गंभीर आहेत, अशी माहिती औरैयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अर्चना श्रीवास्तव यांनी दिली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या भीषण अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. ही माहिती राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी दिली. अपघातातील पीडितांना सर्वतोपपरी मदत देण्यात यावी, तसेच जखमींवर योग्य उपचार करावेत असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *