सांगलीत ९५ वर्षाच्या आजीची कोरोनावर मात

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण देखील बरे होत आहेत. त्यातच आता एका ९५ वर्षाच्या आजीने कोरोनावर मात केली आहे. मिरज शासकीय रुग्णालयातून करोनामुक्त झालेल्या या आजीला आज डिस्चार्ज देण्यात आला.

महाराष्ट्रातील सर्वात वयोवृद्ध कोरोना रुग्ण असणाऱ्या ९५ वर्षीय या आजीने कोरोनावर मात केली. कोरोना रुग्णांच्या कुटुंबातील या आजीला देखील कोरोनाची लागण झाली होती. या आजींना मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते.

डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफ, यानी योग्यप्रकारे आजींवर उपचार केले. आणि आता या आजी कोरोनामुक्त झाल्या आहेत. या आजींना डिस्चार्ज देताना, सर्व मेडिकल स्टाफ उपस्थित होता. सर्वांनी टाळ्या वाजवून आजींचं अभिनंदन केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *