काळ्या सफरचंदाचे सेवन करा,आरोग्याला मिळतील भरपूर लाभ

सफरचंदाचं नियमित सेवन केल्यास तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता भासत नाही. कारण यामध्ये अँटी-ऑक्सिडेंटचे प्रमाण भरपूर असते. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित एक सफरचंदाचे सेवन करावं, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. पण तुम्ही कधी काळे सफरचंद खाल्ले आहे का किंवा पाहिले आहे? आज आम्ही तुम्हाला काळ्या सफरचंदातील (Benefits Of Black Apple In Marathi) पोषक घटकांचीच माहिती सांगणार आहोत. लाल सफरचंदाच्या तुलनेत काळ्या सफरचंदांचं उत्पन्न खूप कमी प्रमाणात घेतले जाते. यामुळे हे फळ सहजासहजी बाजारामध्ये उपलब्ध नसते. काळ्या सफरचंदामुळेही आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो. काळ्या सफरचंदाच्या आरोग्यवर्धक गुणांची माहिती ऐकून तुम्ही या फळाचा आपल्या आहारात नक्की समावेश कराल. जाणून घेऊया काळ्या सफरचंदाच्या सेवनामुळे आरोग्याला होणारे फायदे काळ्या सफरचंदामध्ये अँटी-बॅक्टेरिअल घटक आहेत. हे गुणधर्म आपल्या शरीराचे कित्येक प्रकारच्या हानिकारक बॅक्टेरियांपासून संरक्षण करतात. यामुळे काळ्या सफचंदाचा आपल्या आहारात समावेश करावा. खूप कमी प्रमाणात याचे उत्पन्न घेतलं जात असल्यानं हे फळ अतिशय महाग असते. दुर्मिळ प्रकारचे असणारे हे सफरचंद काळ्या वांग्याप्रमाणे दिसतं. या फळाची चव देखील लाल सफरचंदापेक्षा वेगळी आहे. या फळाला ‘ब्लॅक डायमंड’ असेही म्हटलं जातं.

कम्प्युटरचा वापर, अपुरी झोप, प्रदूषणामुळे डोळ्यांच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. डोळे दुखणे, चुरचुरणे, लाल होणे, डोळ्यांची आग होण्याच्या त्रासामुळे कित्येक जण हैराण होतात. डोळ्यांचे आजार वाढू नयेत, यासाठी योग्य देखभाल करणं आवश्यक आहे. डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी काळे सफरचंद लाभदायक मानले जाते. युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चर यांच्या माहितीनुसार काळ्या सफरचंदामध्ये ‘व्हिटॅमिन ए’ची मात्रा भरपूर आहे. डोळ्यांची दृष्टी चांगली राहावी यासाठी ‘व्हिटॅमिन ए’चा शरीराला पुरवठा होणे आवश्यक असते.

ऑफिस तसंच घरातील काम केल्यानं आपली शारीरिक ऊर्जा खर्च होते. यामुळे थकवा तसंच अशक्तपणा देखील जाणवतो. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी नियमित पौष्टिक आहाराचे सेवन करावे. शक्य असल्यास नियमित एक काळे सफरचंद खावे. तुम्हाला हवे असल्याचा या सफरचंदाचा तुम्ही सॅलेडमध्येही समावेश करू शकता. काळ्या सफरचंदामध्ये कॅलरीचे प्रमाण भरपूर आहे. नियमित या फळाचे सेवन केलं तर पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळते. यामुळे सर्व कामे सहजपणे होतील.

कोणत्याही आजारांविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं आवश्यक आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आपण कित्येक खाद्य पदार्थांचा आहारामध्ये समावेश करतो. या सफरचंदामध्येही शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे घटक आहेत. काळ्या सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी प्रमाण भरपूर आहे, जे अँटी-ऑक्सिडेंटच्या स्वरुपात कार्य करते. अँटी- ऑक्सिडेंट रोगप्रतिकारक पेशी मजबूत करण्याचं कार्य करतात. यामुळे आपल्या शरीराचे गंभीर आजारांपासून संरक्षण होण्यास मदत मिळते.

काळ्या सफरचंदामध्ये हाडांसाठी पोषक असलेल्या घटकांचा समावेश आहे. यामध्ये कॅल्शिअमची मात्रा चांगली असते. यामुळे वेगवेगळ्या हाडांच्या विकारांपासून आपले संरक्षण होण्यास मदत मिळते.

हाडे ठिसूळ होण्याची कारणे

– कंबर, हात आणि मनगटांच्या हाडांमध्ये वेदना असणे

– पाठीला बाक येणे, हाडे कमकुवत होणे,फ्रॅक्चर होणे

– कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे

– धूम्रपान, मद्यपान, लोणचे, मीठ, कॅफिन, शीतपेये यामुळे कॅल्शिअम कमी होते.

पण शरीराचे कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच आहारामध्ये काळ्या सफरचंदाचा समावेश करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *