‘आरोग्य सेतू’ डाउनलोड करा, अन्यथा १ हजार रुपये दंड

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेले आरोग्य सेतू हे अॅप स्मार्टफोनवर डाउनलोड केले नाही, तर एक हजार रुपयांचा दंड केला जाईल, असा इशारा येथील पोलिसांनी मंगळवारी दिला.

नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्यांनी; तसेच येथे बाहेरून येणाऱ्यांनी आरोग्य सेतू हे अॅप डाउनलोड केले नाही, तर त्यांना एक हजार रुपयांचा दंड अथवा सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. हे अॅप डाउनलोड न केल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना डाउनलोड करण्यास सांगितले जाईल, त्यांनी ते त्वरित डाउनलोड केले तर त्यांना माफ केले जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *