बंगळूरु शहरात बुधवारी मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले तर काही ठिकाणी वृक्षही उन्मळून पडले. मंगळवारी दुपारपासून ढगाळ वातावरण होते आणि बुधवारी सकाळी मुसळधार पाऊस कोसळला.
जवळपास तीन तास कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोरमंगला, व्यालीकावल, बागलगुंटे, गरुडाचर पालया आणि जे. बी. नगर आदी किमान आठ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या तर सखल भागांमधील घरांमध्ये पाणी शिरले. शहराच्या काही भागांमध्ये गारपीटही झाली. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे २८.५ मि.मी. तर एचएएल विमानतळ येथे ८९.२ मि.मी. पावसाची नोंद झाली.
