बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचं निधन

बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर वयाच्या 54व्या वर्षी यांनी कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

इरफान खान यांना ‘पानसिंग तोमर’साठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ‘अंग्रजी मिडियम’ हा इमरान यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

इरफान यांना गेल्या काही वर्षांपूर्वी त्याला हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचं समजलं होतं. 2017च्या जून महिन्यात या आजाराबाबत समजल्यानंतर इरफान परदेशात या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी गेले होते. इरफान यांनी स्वत: त्यांच्या आजाराबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये इरफानच्या आई सईदा बेगम यांचं निधन झालं. मात्र लॉकडाऊनमुळे इरफान त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचू शकले नव्हते. त्यांनी व्हिडिओ कॉलवरुच आपल्या आईचं अंतिम दर्शन घेतलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *