राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला करोना; सचिवांसह अनेक क्वारंटीन

देशभर हाहाकार माजवणारा करोना विषाणू आता राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला आहे. प्रेसिडेंट इस्टेटमधील एका कुटुंबासोबत राहणाऱ्या एका महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर संपूर्ण राष्ट्रपती भवन परिसरात खळबळ उडाली आहे. ही करोनाग्रस्त महिला राष्ट्रपती भवनात अपर सचिवांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची पत्नी आहे. या नंतर अपर सचिवाने स्वत:ला क्वारंटीन केले आहे.

महिला झाला सासूकडून संसर्ग

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या महिलेच्या सासूचा करोनामुळे मृत्यू झाला होता. महिलेची तब्येत बिघडल्यानंतर तिची चाचणी करण्यात आली. त्यात तिला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

महिला करोना रुग्णालयात दाखल

महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महिला आणि तिच्या कुटुंबीयांना क्वारंटीन करण्यात आले. या महिलेच्या मुलीमध्येही करोनाची लक्षणे दिसत होती. मात्र तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. या महिलेला प्रथम बिर्ला आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले , मात्र त्यानंतर तिला करोना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *