भारतात करोना व्हायरसमुळे चौथा मृत्यू

भारतात करोना व्हायरसमुळे चौथा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील एका ७० वर्षीय व्यक्तीचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती इटलीमार्गे जर्मनीहून भारतात आली होती. छातीत दुखत असल्यामुळे या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला.

या रुग्णाचा करोना व्हायरसच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंजाबच्या होशियारपूरमधील बांगा येथील रुग्णालयात या व्यक्तीचे निधन झाले.

या व्यक्तीच्या गावापासूनचा तीन किमीपर्यंतचा परिसर बंद करण्यात आला आहे. या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. याआधी करोनामुळे तीन मृत्यू झाले आहेत. त्यात मुंबईतील एका रुग्णाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *