कंपनीसाठी लागणारा माल पुरविण्यासाठी एका व्यापाऱ्याने १२ लाख रुपये घेतले. त्यानंतर कोणताही माल न पुरविता फसवणूक केली. या प्रकरणी गुजरातमधील व्यापाऱ्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुशाल पटेल ऊर्फ खोदाभाई नागजीभाई रमणी (रा. केशवबाग पार्टी, अहमदाबाद, गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी चंद्रकांत वसंत मराठे (वय ६३, रा. अॅसेंट किर्ती एलिगंट सोसायटी, म्हाळुंगे, पुणे) यांनी मंगळवारी (१७ मार्च) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
ही घटना ५ सप्टेंबर २०१९ ते १७ मार्च २०२० या कालावधीत म्हाळुंगे येथे घडली. मराठे यांच्या मराठे उद्योग कंपनीसाठी
फोटो-कॉपी व कागदांची मागणी आरोपी खुशाल पटेल यांच्याकडे केली. त्यासाठी मराठे यांनी आरोपीला १२ लाख रुपये आगाऊ रक्कम दिली. आरोपी याने मालाचा पुरवठा केला नाही; तसेच दिलेले पैसही परत दिले नाही. दिलेल्या पैशांची मागणी केली असता आरोपीने फिर्यादी मराठे यांना शिवीगाळ करून धमकी दिली. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.
