अलिबागजवळ समुद्रात प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. मुंबईहून मांडवा येथे प्रवासी घेऊन निघालेल्या या बोटीचा अपघात झाला आहे. खडकावर आदळून बोट कलंडली आहे. या बोटीत 78 प्रवाशी होते. या सर्व 78 प्रवाशाना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. पोलिसांच्या बोटीने या प्रवाशांना बाहेर काढले आहे. प्रवाशी सुखरूप बाहेर आले असून सुदैवाने अनर्थ टळला आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली घटना
या घटनेची एवढी माहिती आता उपलब्ध आहे.
