‘आपले सर्व सण तिथीनुसार असतात’

औरंगाबादमध्ये आज मनसेचा शिवजयंती उत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी, ३६५ दिवस शिवजयंती साजरी व्हायला हवी असं म्हटलंय. कोणताही सण तारखेनुसार नसतो. हिंदू संस्कृतीनुसार तिथीनुसार सर्व सण साजरे होत असतात. शिवजयंती हा एक सण आहे. त्यामुळे हा सणही तिथीनुसारच साजरा केला जावा, असं राज ठाकरे म्हणाले.

आज ठिकठिकाणी मराठी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, औरंगाबादमध्ये क्रांतिचौकात आज शिवसेनेकडून शिवपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे स्थानिक नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली. आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी केल्या जाणार होती. मात्र या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने शिवसेनेकडून साध्या पद्धतीने शिवपूजन करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *