लग्नमंडपात एक्स-बॉयफ्रेंडला पाहताच तिने असं काही केलं की…

लग्न लागण्याच्या काही क्षणआधी झालेल्या गोंधळामुळे वधू-वर लग्न मोडण्याचा निर्णय घेतात अशी दृष्ये आपण अनेक मालिकांमध्ये आपण पाहतो. बरेचदा अशा मालिकांमध्ये लव्ह ट्रॅगलचा ट्विस्ट असल्यास त्या मुलीचा आधीचा प्रियकर आल्याने ती त्याच्याबरोबर पळून जाते किंवा त्याच्यासाठी लग्न मोडण्याचा निर्णय घेते असं अनेक मालिकांमध्ये थोडाफार बदल करुन दाखवलं जातं. मात्र मालिकांमध्ये दिसणारे हे दृष्य तेलंगणामध्ये सत्यात अवतरले. आपल्या लग्न मंडपामध्ये एक्स बॉयफ्रेंडला पाहिल्यामुळे मुलीने लग्न करायलाच नकार दिल्याचा प्रकार एका गावात आयोजित करण्यात आलेल्या लग्नादरम्यान घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वानापार्टे जिल्ह्यातील चार्लापाले गावामध्ये आयोजित लग्नसमारंभ सुरु असतानाचा हा प्रकार घडला. वधू आणि वर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसहीत लग्नापूर्वीचे धार्मिक विधी पूर्ण करत होते. हे विधी पूर्ण झाल्यानंतर वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्यासाठी मंगळसूत्र हातात घेतले. आता नवरा मुलगा मुलीला मंगळसूत्र घालणार तोच मुलीने मला लग्न करायचं नाही अशी घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तिचा हा निर्णय ऐकून तिच्या नातेवाईकांनी तिला हा निर्णय चुकीचा आहे, असं करु नकोस असा सल्ला दिला. मात्र मुलीने कोणाचेही काहीही ऐकून न घेता लग्नमंडपाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

मुलीच्या कुटुंबाने मुलीचा एक्स बॉयफ्रेंडला लग्नमंडपात आल्याने मुलीने लग्न न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. “आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो निसटला,” अशी माहिती मुलीच्या एका नातेवाईकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *