तरूणीवर सामूहिक बलात्कार

येथील उदयपूरमध्ये तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. सामूहिक बलात्काराची ही घटना उत्तर प्रदेशमधील आग्रायेथे घडली आहे. पीडित तरूणी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये कार्यरत होती. पोलिसांनी पीडित तरूणीच्या सांगण्यानुसार गुन्हा नोंदवून घेतला आहे. त्याआधारे आता या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

रविवारी रात्री तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर येत आहे. पीडित तरूणी आपल्या मित्रासोबत कारमध्ये बसली होती. याच दरम्यान काही तरूण रस्ता विचारण्याच्या बहाण्याने तरूणीसोबत बोलायला आले. त्यानंतर संधी पाहून त्यांनी कारमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर नराधमांनी चाकूचा धाक दाखवत तरूणीवर बलात्कार केला. संपूर्ण रात्र पीडित तरूणी आणि मित्राला कारमध्ये फिरवलं असल्याचं समोर येत आहे. शिवाय या नराधमांनी दोघांना सोडण्यासाठी तब्बल २ लाख रूपयांची खंडणी देखील मागितली.

परंतु, सकाळी त्या नराधमांनी पीडित तरूणी आणि तिच्या मित्राला एका निर्जन स्थळी नेवून सोडले. त्यानंतर पीडित तरूणीच्या मित्राने सोमवारी संध्याकाळी गोवर्धन विलास पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

सामूहिक बलात्कार प्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनंत कुमार यांनी सांगितले की, ‘घटनेचं गांभिर्य लक्षात घेत तात्काळ चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीमध्ये पोलिसांनी चार आरोपिंना अटक केली. शिवाय पीडितेची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली आहे.’ दिवसागणिक बलात्काराच्या घटना वाढल्याचे चित्र समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *