IPL मॅच फिक्सिंग उघड करणारे एसएन श्रीवास्तव दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त

दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एसएन श्रीवास्तव यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते अमूल्य पटनायक यांची जागा घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी बदलीच्या वृत्ताला दुजोरा दिला. दिल्लीत हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल दिल्ली पोलिसांवर मोठया प्रमाणात टीका सुरु आहे. दिल्ली जळत असताना पोलीस कुठे होते? असा सवाल अनेकांनी विचारला होता.

दिल्लीतील  या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमूल्य पटनायक यांच्याजागी एसएन श्रीवास्तव यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीतील या हिंसाचारात आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

एसएन श्रीवास्तव १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना सीआरपीएफमधून पुन्हा दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी आणण्यात आले आहे. एसएन श्रीवास्तव यांच्या कार्यकाळात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयपीएल मॅच फिक्सिंगचा खुलासा केला. तेव्हा ते, स्पेशल सेलचे विशेष पोलीस आयुक्त होते. अमूल्य पटनायक उद्याच २९ फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *