पत्नीने मुलीच्या मदतीने केली पतीच्या प्रेयसीची हत्या

रानसई मार्गालगत सोमवारी मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटली असून ही माहिला नवी मुंबईतील शहाबाज बेलापूर परिसरात राहणारी असल्याची माहिती समोर आली आहे. या हत्याप्रकरणी उरण पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे.

मृत महिला ही अटक करण्यात आलेल्या माहिलांपैकी एका महिलेच्या पतीची प्रेयसी होती असं पोलीस तपासात उघड झालं आहे. मयत महिलेचे नाव कल्पना ऊर्फ जया घाणेकर असल्याचे पोलिसांनी प्रिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

या गुन्ह्यातील आरोपी महिलेचा पती व मृत महिला यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांनी लग्नही केलं होते. त्यामुळे पती आणि पत्नीमध्ये कायम वाद व्हायचे. वारंवार होणाऱ्या वादाने त्रस्त होऊन आरोपी महिलेने पतीच्या प्रेयसीला चिरनेर येथे बोलवून घेतलं. मनासरोवरवरुन पतीची प्रेयसी या महिलेल्या भेटण्यासाठी चिरनेर येथे आली असता मुलगी आणि तिच्या मित्राच्या मदतीने या महिलेने कल्पनावर तीक्ष्ण हत्याराने २५ पेक्षा अधिक वार करुन तिची हत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *