नराधम बापाकडून मुलीवर बलात्कार

नराधम बापाने एका वर्षांपासून मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक व नात्याला काळिमा फासणारी घटना खामगाव तालुक्यात उघडकीस आली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. खामगाव तालुक्यातील व पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कुटुंब नातेवाईकांकडे गेल्या महिनाभरापासून राहत होते. त्याठिकाणी नराधम बापाने मुलीला धमकावत बलात्कार केला. कुणाला काही सांगितल्यास तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वी सुद्धा त्याच्याकडून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला होता. ठाणेदार चव्हाण यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *