नाशिकमध्ये सीता सरोवरात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

नाशिक येथील सीता सरोवरात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरूवारी रात्री अकरा-साडेअकराच्या सुमारास सीता सरोवरात पाच जण अंघोळीसाठी गेले होते. त्यातील चार युवक सरोवरात उतरले होते. त्यापैकी दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हर्षल साळुंके (३२), हेमंत गांगुर्डे (३०) अशी मृत तरुणांची नावं आहेत.

दारूच्या नशेत पैज लावणं नाशिकमधल्या दोघांच्या जीवावर बेतलंय. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पार्टी करून पाच युवक कपालेश्वराच्या दर्शनाला चालले होते. वाटेतच म्हसरुळ जवळच्या ऐतिहासिक सीता सरोवर इथे अंघोळीसाठी थांबले. त्यातच जो लवकर बाहेर येईल तो सर्वांना पार्टी देईल अशी पैंज लागली मात्र त्याचवेळी दोघांना पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. हर्षल साळुंखे आणि हेमंत गांगुर्डे अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून म्हसरुळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *