बागेत खेळणाऱ्या २ वर्षाच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू

कोपरीमध्ये बागेत खेळायला गेलेल्या दोन वर्षांच्या बाळाला साप चावल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पार्क मध्ये खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांमध्ये आणि पालकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. सुमीत सोनकांबळे असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे.

यापूर्वी २८ जानेवारी रोजी सीवूड्सच्या पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या ईशान सेनला या ७ वर्षाच्या मुलाला शाळेत साप चावला होता. त्याला उलट्या आणि चक्कर येऊ लागले होते, सुदैवाने वेळेवर त्याच्यावर उपचार केल्याने तो बचावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *