जुन्नर येथील किल्ल्यावरुन पडून ठाण्यातील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

शिवजयंती साजरी करण्यासाठी आलेल्या तरुणीचा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुकामधील हडसर किल्ल्यावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही तरुणी २० वर्षांची होती. तिला ट्रेकिंगची आवड होती. शिवजयंतीनिमित्ताने ती या गडावर ट्रेकिंगसाठी आली होती. २० वर्षीय  सिध्दी कामठे असे या मृत तरूणीचे नाव आहे. सिध्दी ही मुळची ठाण्याची रहिवासी आहे.

ठाणे येथील सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशनचा एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी या किल्ल्यावर आला होता. दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान किल्ला सर करत असताना सिध्दी कामठेचा बुरूजावरून तोल गेला आणि ती गडावरून खाली कोसळली.

सिद्धीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सिध्दीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *