२ वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला, शोधकार्य सुरू

२ वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. नाल्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचं नाव संस्कार साबळे असं आहे. पुण्याच्या दत्तवाडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांना या घटनेची बातमी कळताच मुलाचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली आहे.

संस्कार तेथील एका कठड्यावर खेळत होता पण तो कठडा सुरक्षित नसल्यामुळे मुलाचा तोल गेल्याने तो वाहून गेला असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय तो कठाडा देखील कोसळला आहे. सकाळपासून पुण्यात दुसरी दुर्दैवी घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *