तीन कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये ठाण्यातील भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांना अटक

ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला तीन कोटींची खंडणी मागून त्याच्याकडून तीन लाखांची वसूल केल्याचा आरोप असलेले ठाणो महापालिकेतील भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांना सोमवारी कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना 14 फेब्रुवारीर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत.

घोडबंदर रोड येथील एका बडया बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याविरुद्ध 2015 मध्ये तीन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करीत कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पवार यांनी 2008 मध्ये त्यांच्याकडून तीन लाख रुपये उकळले होते. ही तक्रार दाखल झाल्यानंतर पवार यांनी अटक टाळण्यासाठी ठाणो न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, ठाणो न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यासाठी अर्ज केला होता. तेंव्हा उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. अगदी अलिकडेच सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेल्यानंतर तिथेही त्यांना जामीन मिळू शकला नाही. त्यानंतर गेली काही दिवस कासारवडवली पोलीस त्यांच्या मागावर होते. परंतू, ते पोलिसांना हुलकावण्या देत होते. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक पी. एन. उगले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *