औरंगाबादमध्ये क्रूझरची ट्रेलरला धडक, भीषण अपघात चार भाविकांचा जागीच मृत्यू

औरंगाबादमध्ये क्रूझरचा भीषण अपघात झाला आहे. क्रूझरने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गाढेजळगाव शिवारात हा अपघात झाला. मृत प्रवासी इगतपुरी येथे देवदर्शन करुन बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे परतत असताना हा अपघात झाला. काशिनाश म्हेत्रे, रवी जाधव, संगीता बुंदे आणि ऋषीधर तिडके अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण सिंदखेडराजाचे ग्रामस्थ आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण इगतपुरी येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना करमाड य़ेते रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या क्रूझरने रस्त्याच्य्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला धडक दिली. या अपघाता चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *