फुलराणी म्हणून ओळखली जाणारी बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आज भाजपात प्रवेश करणार आहे. सायना नेहवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचार करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ती आज भाजपात प्रवेश करणार आहे. सायना नेहवालचा जन्म हरियाणाचा असून भारतातील यशस्वी खेळाडूंच्या यादीत तिचा समावेश आहेत. सायनाने ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकाची कमाई केली आहे. २०१५ मध्ये सायना नेहवाल जागतिक रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर येणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली होती. सध्या ती नवव्या क्रमांकावर आहे.
