सेंट जॉन शैक्षणिक संस्थेच्या कॅम्पसमध्ये चोरी

पालघर येथील सेंट जॉन शैक्षणिक संस्थेच्या परिसरात असलेल्या शैक्षणिक कार्यालयावर दरोडा टाकून सुमारे पाच लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. पालघरपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या शैक्षणिक आवारामध्ये पहिली ते दहावीपर्यंत शाळा, अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालयातील कार्यालयातील काही मोजकी कपाटे फोडण्यात आली. चार चोरांनी मध्यरात्रीनंतर या शैक्षणिक संस्थेच्या आवारात प्रवेश केला. ज्या कपाटांमध्ये परीक्षेच्या प्रवेश शुल्काच्या रूपाने गोळा केलेली रोख रक्कम ठेवली होती ती कपाटे नेमकी फोडून रोख रक्कम लंपास केली आहे.

हे चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. शैक्षणिक संस्थेच्य आवारत असलेल्या कार्यालयांमधील नेमकी रोख रक्कम असलेली कपाटंच कशी फोडण्यात आली? हा प्रश्न पोलिसांनीही पडला आहे. या चोरीमध्ये संस्थेतील कोणी माहितगार नाही ना? याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *