दोनशे रुपये चोरल्याच्या संशयावरून वांद्रे निर्मलनगर येथे एका तरुणाची हत्या करण्यात आली. रमेश शेट्टी (२५) असे मृत तरुणाचे नाव असून, निर्मलनगर पोलिसांनी याप्रकरणी मूर्ती कंद्रीवेल (२२) याला अटक केली.
वांद्रे पूर्वेकडील चामाडावाडी नाल्याच्या कट्ट्यावर रमेश आणि मूर्ती हे दोघे बुधवारी बसले होते. दोनशे रुपये चोरल्याचा आरोप मूर्ती याने रमेशवर केला. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. मूर्ती याने नाल्याच्या कठड्यावरच रमेशला मारहाण केली. रागाच्या भरात मूर्ती याने रमेशला नाल्यात फेकून दिले. उंचावरून पडल्याने रमेश नाल्यातील दगडांवर आपटला आणि गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात निर्मलनगर पोलिसांनी मूर्ती याला अटक केली.
