पनवेलमध्ये जुळ्या भावंडांचा बुडून मृत्यू

मृत्यू झाल्याची घटना वलप गावात घडली. लव आणि अंकुश यादव (वय सहा वर्षे) अशी या मुलांची नावे आहेत. हे दोघेही खेळत असताना एकाचा तोल जाऊन तो खदानीतील पाण्यात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याचाही तोल गेल्याने तोही बुडाला. घटनेच्या काही मिनिटांनंतर शेजारच्या तरुणांनी या मुलांना पाण्याबाहेर काढले. त्यांना तातडीने पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *