बदलापुरात केमिकल कंपनीत स्फोट; एक ठार

बदलापूर एमआयडीसी परिसरात जे.के.रेमेडीज या केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी ९ च्या सुमारास कंपनीत स्फोट झाला. स्फोटाची तिव्रता भयंकर असल्यानं विष्णु धडाम या ६० वर्षाच्या कामगाराचा जागीच मृत्यु झाला. आगीची माहिती मिळताच कुळगाव-बदलापूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि एका तासाच्या अथक परिश्रमा नंतर त्यांनी आगीवर नियत्रंण मिळवलं .

स्फोटाच्या घटनेत आणखी तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा हादरा बदलापूर पूर्व परिसरातील आनंदनगर ,शिरगाव, कात्रप मानकीवली, खरवई जुवेली आदी परिसरातील सुमारे तीन किलोमीटर परिसरात जाणवला.

या स्फोटाच्या आवाजानं आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. या स्फोटात विजयपथ पिंगवा हा कामगार (वय २०) ९० टक्के ,झागरा मोहतो (वय ५६) हा ८०टक्के तर विनायक जाधव वय ५६ हा कामगार ४० टक्के भाजला आहे . त्यांची प्रकुती गंभीर आहे. या जखमी कामगारांना उपचारासाठी ऐरोली येथील बर्न केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *