आई-मुलासह तिघांचा तळ्यात बुडून मृत्यू

पुणे नगर महामार्गावरील वाघोली येथे आज दुपारी 4 च्या सुमारास अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. महामार्गालगत असलेल्या भैरवनाथ मंदिराजवळील तळ्यात आई-मुलासह तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रोहिणी पाटोळे या चाळीस वर्षीय महिला आपल्या बारा वर्षीय मुलगा स्वप्निल सोबत तलावावर धुणे धुण्यासाठी गेलेल्या असताना मुलगा स्वप्निल तलावात पोहताना अचानक बुडाला.

त्याला वाचवण्यासाठी आई रोहिणी पाटोळे गेल्या पण मुलासोबत त्याही तलावात बुडाल्याने जवळीच दत्तात्रय जाधव या तरूणाने ही घटना पाहताच त्यांना वाचनण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ही यात अपयश आले. दुर्देवाने या तिघांचाही तलावात बुडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने या सर्वांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू असून स्वप्निलचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. तर इतर दोघांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *