चालत्या बसमध्ये गतिमंद मुलीचा विनयभंग

औरंगाबादमध्ये चालत्या स्कूलबसमध्ये गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी संध्याकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी जात असताना हा प्रकार घडला आहे. ८ वर्षीय चिमुकली गतिमंद शाळेत शिकत होती. या प्रकरणात बसच्या चालकासह आणखी दोन जणही सामिल होते.

या घटनेचं मोबाईलमध्ये चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ व्हाट्सऍपवर स्टेटस ठेवलं होतं. शाळा प्रशासनाला एका जागृत नागरिकाने माहिती दिल्यावर याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *